दोन तारखेपासून ठराविक वर्गाच्या शाळा उघडण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यात सम आणि विषम ही पद्धत बंधनकारक केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर शालेय व्यवस्थापन समिती, जागृत पालक, सरपंच, पोलीस पाटील इत्यादी घटकांना सामावून घेणेसंबंधी सूचना केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेणेसंबंधी मौलिक सूचनेनुसार पालक मंडळीने आपल्या मुली-मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम राठोड (मराठी) व कुणाल राठोड (इंग्रजी) माध्यम यांनी केले.
विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:28 AM