शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अंगणवाड्यांनी गाजविला पोषण महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:46 AM

तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची ३२० अंगणवाडी केंद्राने सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात आली. एक महिना विविध विभागाच्या सहकायार्ने ग्रामीण भागातील वातावरण उपक्रममय झाल्याचे चित्र होते. कुषोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.

ठळक मुद्देकंधार तालुक्याचे चित्र : आता कुपोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होणार का, याची तालुकावासियांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची ३२० अंगणवाडी केंद्राने सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात आली. एक महिना विविध विभागाच्या सहकायार्ने ग्रामीण भागातील वातावरण उपक्रममय झाल्याचे चित्र होते. कुषोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.गरोदर महिलांची काळजी, प्रसूतीनंतर तात्काळ आणि सहा महिन्या पर्यंत स्तनपान, सहा महिन्यानंतर बालकांना वरचा आहार सुरू करणे,बालकांचे वृद्धी संनियंत्रण, वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता, मुंलीचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे योग्य वय,आरोग्यदायी आणि सूक्ष्म पोषणमूल्य असलेल्या आहाराचे सेवण आदी संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम व उपक्रम राबवून पोषणाची लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्याप्रकारे करण्यात आला. प्रभातफेरी, बालपंगत, विशेष ग्रामसभा,पोषण विषयावर शाळेत चित्रफित, योग्य आहाराचे सेवन मार्गदर्शन,बचत गटाच्या बैठका, अंगणवाडीत वजन महोत्सव, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण दिवस, गणेशोत्सव काळात योजनेची प्रसिद्धी, योगा आयोजन, हात धूणे उपक्रम,चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजन, परसबाग निर्माण, आरोग्य तपासणी, आदी उपक्रम नेटाने राबविण्यात आले.अखेर अहवाल संकलन करून २ आॅक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात ग्रामसभेत अभियानाची माहिती देण्यात आली आणि या पोषण महिन्याचा समारोप करण्यात आला.यशस्वी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कैलास बळवंत, पर्यवेक्षिका सुशीला घुगे, उषा चव्हाण, विजया नागरगोजे, निर्मला सर्कलवाड,सुचिता सुर्वे, आशा धोंडगे, चंद्रकला पोले,गंगासागर नरवाडे,जि.प.व पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, ग्रामस्थ, मदतनीस, कार्यकर्ती आदीनी अथक प्रयत्न केले.वातावरण महिनाभरात कुपोषणमुक्तीसाठी पोषक करण्यात आले होते. हे आगामी काळात असेच ठेवून तालुका कुपोषणमुक्त होईल अशी आशा आहे.यापूर्वी अनेक उपक्रम राबवून सुद्धा कुपोषणमुक्ती झाली नाही. आता तरी व्हावी अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 

  • तालुक्यात राष्ट्रीय पोषण अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना निश्चित केलेल्या उद्दिष्टाना साध्य करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमातून करण्यात आला. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकातील खूजे/बूटकेपणा व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे,सहा महिने ते एकोणसाठ महिने वयोगटातील बालकामधील रक्ताल्पताचे प्रमाण कमी करणे, १५ वर्षे ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिला मधील रक्ताल्पता कमी करणे, जन्मता कमी वजन असणाऱ्या बालकाचे प्रमाण कमी करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करण्यात आला.
टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाfoodअन्नEducationशिक्षण