येरे पाटील यांचे व्याख्यान
हदगाव : तालुक्यातील लिंगापूर येथे १३ डिसेंबर रोजी आदर्श सरपंच येरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक भागवत देवसरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार, तर अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, तहसीलदार जीवराज डापकर, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते.
हरिकीर्तनाचा कार्यक्रम
हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे ११ डिसेंबर रोजी हरिकीर्तन व भजन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. दिगंबर महाराज नखाते यांचे भजन होईल. नंतर हरिकीर्तन होणार आहे, अशी माहिती आयोजक गजानन माने यांनी दिली.
क्रिकेटचे खुले सामने
हिमायतनगर : तालुक्यातील वाशी येथे १६ डिसेंबरपासून क्रिकेटचे खुले सामने आयोजित करण्यात आले आहेत. प्रथम बक्षीस ११ हजार, दुसरे ६ हजार आणि तिसरे बक्षीस ३ हजार आहे. स्पर्धेचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोतराव बोथगे तर अध्यक्षस्थानी पोलीस पाटील राजू देशपांडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव डवरे, रघुनाथ बेले, आनंदराव मोरे, उत्तमराव डवरे, मारुती खुपसे, दामाजी काळे, व्यंकटेश रघुजीराव आदींची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेसाठी बालाजी खोकले, दीपक आडे, परमेश्वर झळके, राहुल मोरे, दत्ता बेले, बालाजी वानोळे, यादव मिरासे आदींची उपस्थिती राहणार आहे.
धान खरेदीचा शुभारंभ
किनवट : तालुक्यातील अप्पाराव पेठ येथे धान खरेदीचा शुभारंभ गुरुवारी खा. हेमंत पाटील व आ. भीमराव केराम यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, जि.प. सदस्य सूर्यकांत आरडकर, भगवान हुरदुके, उपसभापती कपिल करेवाड, बालाजी आल्लेवाड, मीनाक्षी वेटी, नीळकंठ कातले, गजानन बच्चेवार, काशीनाथ शिंदे, दत्ता बेहरे, मारुती माहूरकर आदी उपस्थित होते.
बाबासाहेबांना अभिवादन
माहूर : तालुक्यातील पाचुंदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, मीराबाई वाठोरे, संगीता राऊत, पद्मीन आडागळे, रमाबाई महामुने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला काशीराम पवार, येमासिंग चव्हाण, गौतम महामुने, उत्तम पवार, नीळकंठ डाळके, जी.एल. कांबळे आदी उपस्थित होते.
वंचित आघाडीची निदर्शने
बिलोली : वंचित बहुजन आघाडीने भारत बंद आंदोलनाला पाठिंबा देऊन निदर्शने केली. शेतमालाला कायद्याने किमान हमीभावाचे संरक्षण मिळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी गौतम गावंडे, मुकिंदर कुडके, मुन्ना पोवाडे, चंद्रकांत कुडके, गणपत लंके, साईनाथ जाधव, स्वरूप जाधव, शिल्पकार जाधव, नबाजी जाधव, शेषराव गावंडे आदी उपस्थित होते.