हुंडा कमी दिल्याने विवाहितेचा छळ
लग्नात हुंडा कमी दिला असून, स्वयंपाकही येत नाही. त्यामुळे कार घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी खडकपुरा आणि नागपूर येथे विवाहितेचा छळ करण्यात आला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात इतवारा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
खुदबईनगर भागात जुगारावर छापा
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुदबईनगर भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सात हजार रुपये जप्त केले असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे, तर ढवळे कॉर्नर येथून तीन हजार रुपये अन्य घटनेत जप्त केले.
पत्र्याच्या शेडमध्ये दारूचा साठा
ढवळे कॉर्नर ते उस्माननगर रस्त्यावर गजभारे धाब्याच्या शेडमध्ये विनापरवाना देशी आणि विदेशी दारू ठेवण्यात आली होती. कंधार पोलिसांनी तीन हजार रुपयांची दारू जप्त करून गुन्हा नोंद केला.