वृद्ध कलावंतांना शासनाकडून दर महिन्याला ठराविक मानधन दिले जाते; परंतु नोव्हेंबर २०२० पासून या कलावंतांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे पोटासाठी अनेक कलावंतांना इतर कामे करण्याची वेळ आली. मात्र, कलावंत वृद्ध असल्यामुळे त्यांना या वयात इतर कामे करता येत नाहीत, तसेच कोणी कामही देत नाही. औषधोपचारासाठी या मानधनाची मोठी मदत होते. मात्र, आता मानधनच नसल्यामुळे या कलावंतांची परवड होत आहे.
चाैकट-
कोरोना काळात दिवाळीच्या तोंडावर नोव्हेंबर महिन्यात मानधन मिळाले. मात्र, तेव्हापासून अद्याप मानधन मिळाले नाही. बाहेर कोणतेही कार्यक्रम होत नसल्याने आता मानधनावरच सर्व अवलंबून आहे. मात्र, तेही वेळेवर मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
-शाहीर रमेश गिरी, नांदेड
चौकट-
वर्षभरापासून कलावंत आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ऐन सिझनमध्ये कोरोनाचे संकट आले. त्यामुळे वर्षभराची कमाई गेली. आता कर्जबाजारी होऊन जगणे नशिबी आले आहे. शासनाकडून मिळणारे मानधन वेळेवर मिळाल्यास मोठा आधार मिळेल.
-नागनाथ दत्तात्रय मामीडवार, नांदेड
चौकट-
समाजमन घडविणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेक वृद्ध कलावंतांना मानधनाशिवाय कोणताही आधार नाही. अशावेळी शासनाने मानधन वेळेवर दिल्यास या कलावंतांना नक्कीच बळ मिळेल.
-व्यंकटराव पेंटाजी झग्गेवार