चौकट- काय आहे स्किझोफ्रेनिया आजार
या मानसिक आजारात वेगळ्या प्रकारचे भास होतात. कानात विचित्र लोकांचे आवाज येतात. ते आवाज त्या व्यक्तीला शिव्या देतात. त्याच्याबद्दल वाईट बोलतात, तसेच त्यांना सतत काही करायला सांगतात. ते आवाज कधी त्यांना रेल्वेसमोर झोप, इमारतीवरून उडी मार, समोरच्या व्यक्तीला इजा पोहोचव, असे सांगतात. त्यानुसार, हा आजार झालेली व्यक्ती वर्तन करते.
चौकट- मेंदूतील रासायनिक बदलामुळे आजार
स्किझोफ्रेनिया हा आजार मेंदूतील रासायनिक बदलामुळे होतो. योग्य औषधोपचार आणि विद्युत उपचार पद्धती याद्वारे रुग्ण पूर्णपणे बरा होताे, परंतु कुटुंबातील सदस्यांनीही अशा रुग्णाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कानात ऐकू येणाऱ्या आवाजामुळे ही व्यक्ती कधी स्वत: तर कधी दुसऱ्याला इजा पोहोचवू शकते. त्यामुळे अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
- डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ