शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:53 AM

हदगावमधून मोबाईल लंपास हदगाव : येथील नवीन बसस्थानकातील प्रवाशाचा मोबाइल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हदगाव येथील वैभव ...

हदगावमधून मोबाईल लंपास

हदगाव : येथील नवीन बसस्थानकातील प्रवाशाचा मोबाइल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हदगाव येथील वैभव कळसकर हे पुसद ते लातूर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी कळसकर यांच्या खिशातील मोबाइल चोरून नेला. हदगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

दारू विक्रेत्यांवर कारवाई

मुक्रमाबाद : बाऱ्हाळी ते हातराळ रस्त्यावरील दुकानावर पोलिसांनी छापा टाकून जवळपास पाच हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस जमादार सूर्यवंशी, पोलीस नायक नरबाग तपास करीत आहेत.

सावित्रीबाई फुले जयंती

बिलोली : अर्जापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. याच कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. याशिवाय निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला विठ्ठल नवाते, सलीम शेख, साजीद शेख, गायकवाड, मरकंटे आदी उपस्थित होते.

पोलीस दिनानिमित्त कार्यक्रम

नायगाव : पोलीस वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक आश्रमशाळा, मरवाळी तांडा येथे महिलांवरील अन्याय या व अन्य विषयांवर कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन हेमंत बावणे यांनी केले. कार्यक्रमाला माजी प्राचार्य के.आर. राठोड, मुख्याध्यापक बेटकर, जाधव, जिंदमवार, बोईवार, मेहत्रे, कल्याण, वळगे आदी उपस्थित होते.

तंजीम- ए- इन्साफ संघटना

धर्माबाद : तंजीम- ए- इन्साफ संघटनेची कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. तालुकाध्यक्षपदी सय्यद अल्ताफ, शहराध्यक्ष महंमद मुबशीर, तर सचिवपदी नावीद अहमद यांची निवड झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर, मोईन कुरेशी, जुबेरखान, अझरोद्दीन उपस्थित होते. कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष सय्यद अरीफ, अब्दुल रशीद, संघटक समीर अहमद, सहसचिव डॉ. मसूद खान, रहीम खान, सय्यद बाबर, कोषाध्यक्ष अब्दुल उस्मान, प्रसिद्धीप्रमुख अब्दुल रज्जाक, सदस्य शेख इमरान, अब्दुल कुददूस, शेख अजीज.

पांगरगाव बिनविरोध

मुदखेड : तालुक्यातील पांगरगाव येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली. याकामी शिवदास गाडे, हौसाजी गाडे, वामन गाडे, दादाराव गाडे, दत्तराम गाडे, भगवान महाजन, नारायण गाडे, माधवराव गाडे, साहेबराव गुरुजी, बालाजी गाडे, लक्ष्मण गाडे, जगन्नाथ तळणे, दत्तराम कुदरे, गंगाराम गाडे आदी उपस्थित होते.

कोरेगावात शौर्य दिन साजरा

किनवट : सारखणी येथील आंबेडकरनगरातील बौद्ध बांधवांच्या वतीने कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला. पंचशील ध्वजारोहण त्र्यंबक पुनवटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ मुनेश्वर, मिलिंद कांबळे यांची भाषणे झाली. यानिमित्ताने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रात्री गीतगायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आयोजक मिलिंद कांबळे, नवीन वाघमारे, अमोल कांबळे, पंजाब कांबळे, दयानंद कांबळे, दशरथ कांबळे, राजू भवरे, भारत भवरे, बाळू कांबळे, संदेश देवतळे, बाळू मानकर, नितीन कांबळे, गोलू कांबळे आदी उपस्थित होते.

अवैध वाहतूक वाढली

बिलोली : सगरोळी परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक वाढली आहे. ऑटो, दुचाकी, ट्रॅक्टर आदींचा वापर यासाठी केला जात आहे. बहुतांश वाहनचालकांकडे वाहतुकीचा परवाना नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

शालेय साहित्य वाटप

माहूर : अंजनखेड येथील कै. करनू कुडमेथे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकाश कुडमेथे, श्रीमती वाघमारे, आकाश नाईक, संदीप आडावे, दिगंबर वाघाडे, विलास भगत उपस्थित होते.