सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:07 AM2019-01-19T01:07:17+5:302019-01-19T01:07:56+5:30
देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
नांदेड : देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकरी, व्यापारी व सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे काम मोदी व फडणवीस सरकारने केले. त्यामुळे या सरकारला सत्तेतून बाहेर काढून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन भोकरच्या आ. अमिताताई चव्हाण यांनी केले.
बिलोली तालुक्यातील लोहगाव व आरळी या जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ कमिटी कार्यकर्ता शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, मंगलाताई निमकर, जि.प.सदस्य संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, गंगाधर सोंडारे, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, केदार पाटील सोळुंके, प्रा.डॉ.कविता सोनकांबळे उपस्थित होते़ यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बुथ कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे पाळेमुळे अधिक मजबूत करण्याचे काम होत आहे. प्रत्येक बुथ कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जास्तीचे मतदान करून घेणे गरजेचे आहे. मोदी व फडणवीस सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेतकºयांना बँकेत खाते काढण्यासाठी ३ हजार रुपए भरावे लागले. या खात्यावर १५ लाख रुपये येतील या भावनेने लाखो लोकांनी बँकेत खाते काढले खरे, परंतु खात्यावर पैसे तर जमा झालेच नाहीत, परंतु जे पैसे भरलेत तेही आता काढता येत नाहीत. शेतीमालाचे भाव कमी केले. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. शेतकºयांच्या मालाची सरकार खरेदी करीत नाही. या शासनाने शेतकºयांना बँकेच्या व आॅनलाईन अर्ज भरून घेणाºया केंद्राच्या लाईनमध्ये उभे केले. या भागात काँग्रेस आमदार नसल्यामुळे जनतेची कामे झाली नाहीत.