कबड्डी सामन्यांच्या बक्षिसांचे स्वरूप अनुक्रमे प्रथम ५१ हजार रुपये रफिकखान पठाण यांच्यातर्फे, द्वितीय ३१ हजार जीवन कोटरंगे, ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून तृतीय २१ हजार प्रमोद मोहर्ले, रमेश हळदकर यांच्यातर्फे व चतुर्थ ११ हजार रुपये देवेंद्र तिवारी यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे.
सामन्यांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुनयना विशाल जाधव यांच्या हस्ते गावाच्या सरपंच कौशल्याबई मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली माजी जि.प. सदस्य बंडूसिंग नाईक, तंटामुक्त अध्यक्ष जगन कोटरंगे, विश्वनाथ चव्हाण, चेअरमन प्रकाश आत्राम यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. हेमंत पाटील, आ. भीमराव केराम, शिवसेनेचे जोतिबा खराटे, सचिन नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे. क्रीडाप्रेमी बांधवांनी या कबड्डी सामान्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक जीवन कोटरंगे, ज्ञानेश्वर पवार, गणेश पडगीलवार यांनी केले आहे.