शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:18 AM

दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देशहरवासियांपुढे समस्यांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. करवाढीची कोणतीही घोषणा होण्यापूर्वीच अपेक्षित करवाढीला नागरिकांसह विविध राजकीय मंडळींकडून विरोध होत आहे.शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात आहे. शहरात प्रतिदिन १ ते दीड हजार मालमत्ताचे मूल्यांकन केले जात आहे. या मूल्यांकनानंतर मालमत्तधारकांना कराच्या नोटीस बजावल्या जाणार आहेत. प्रस्तावित करवाढ किती राहील? हे अद्यापही अस्पष्टच असले तरीही करवाढ होणार हे निश्चित आहे. रेडी रेकनर दरानुसार करवाढ झाल्यास ती विद्यमान कराच्या दुप्पट होईल. मात्र चालू कराच्या ४० टक्क्याहून अधिक करवाढ करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून जवळपास ४० टक्के करवाढ केली जाईल, असे संकेत दिले जात आहेत. प्रशासनाकडून मालमत्ताकराच्या नोटीसही तयारीही केली जात आहे. त्यात नवीन दरानुसार वाढीव अथवा कमी झालेला कर यापुढेही कर नोटीसीमध्येही वसूल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हातात पडलेल्या कराच्या मागणी नोटीसमध्ये कमी-अधिक आकारणी झाल्यास ती पुढच्या कर आकारणीत वसूल केली जाणार आहे.महापालिकेच्या प्रस्तावित करवाढीस शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनीही विरोध दर्शविला आहे. शिवसेनेचे एकमेव नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनीही करवाढ झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता महापालिकेने सुचविलेल्या करवाढीला सत्ताधारी कितपत स्वीकारतील, हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.---काँग्रेसकडूनही करवाढीच्या नोटीसला विरोधच !सत्ताधारी काँग्रेसनेही प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या करवाढीच्या नोटीसला विरोध दर्शविला आहे. शहरातील मालमत्तांचे जीआयएसकडून फेरमूल्यांकन केले जात आहे. या फेरमूल्यांकनानंतर जी काही नैसर्गिक करवाढ होईल ती मान्य करण्यात येईल. मात्र प्रशासनाकडून फेरमूल्यांकनापूर्वीच दिल्या जाणाºया नोटीस या चुकीच्या असल्याचे सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी स्पष्ट केले. याबाबत महापौर शीलाताई भवरे, सभागृहनेते गाडीवाले यांनी आयुक्तांशी चर्चाही करत प्रस्तावित करवाढीस विरोध दर्शविला आहे. यापूर्वी शहरवासियावर रेडी रेकनर दरानुसार करवाढीचा मोठा बोजा बसला आहे. शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकनानुसार कर आकारणी करावी. मात्र त्यात कोणतीही वाढ करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडTaxकरNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका