पन्नास टक्क्यांनी वाढले दर
फेब्रुवारी महिन्यात शंभर ते दीडशे रूपये किलोप्रमाणे मिळणारी संत्री आजघडीला दाेनशे ते अडीचशे झाले आहेत. त्याचबरोबर मोसंबीही अडीचशे ते तीनशे रूपयांच्या घरात पोहोचले आहेत. लिंबू प्रतिनग दोन ते पाच रूपये आणि प्रतिकिलो दोनशे ते तीनशे रूपये प्रमाणे विक्री होत आहेत. सदर फळे पाणीदार असल्याने इम्युनिटी वाढविण्यासाठी उन्हाळ्यात या फळांची मागणी वाढते.
संत्री नागपूरची तर मोसंबी अन् लिंबू नांदेडच्या मुदखेड, लिंबगावातून
नांदेड शहरात मोसंबी, संत्री नागपूर, मुंबई, हैदराबाद आदी शहरातून मागविण्यात येतेे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, लिंबगाव परिसरातूनही मोठ्या प्रमाणात मोसंबी, संत्री आणि लिंबाचीही आवक होते. सध्या लोकलचा माल कमी असल्याने बाहेरून माल मागवावा लागतो. मागील महिनाभरापासून मागणीत वाढ झाली असून ग्राहक पैशांचा विचार न करता दर्जेदार मालाची मागणी करत आहेत. - मोहम्मद काझी, फळविक्रेता, नांदेड.
मोसंबीमध्ये सी व्हिटॅमिन जास्त असून ज्युस करून पिल्यास आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. अशक्तपणा दूर होवू शक्ती वाढण्यास मदत होते. डॉ.शिवानंद बासरे, आहारतज्ज्ञ, नांदेड
संत्रीचे सेवन केल्याने सर्दी दूर होवून कोरडा खोकला कमी होण्यास मदत होते. मोसंबी, संत्री खाल्याने भूक वाढण्यास मदत होते. तसेच शरारातील पाण्याचेही प्रमाण वाढते. - डॉ.रूपेश भोसले, नांदेड.
कोरोना काळातच नव्हे तर नियमितपणे ऋतुनुसार येणाऱ्यांचे फळांचे सेवन करणे, त्याचे ज्युस करून लेकरांना देतोच. परंतु, कोरोना काळात विशेष आहार म्हणून नियमितपणे सी व्हिटॅमिनसाठी उपयुक्त फळांचा ज्यस करून घेतोत. त्यामुळे फ्रेश वाटते. - सुनीता मिरटकर, शारदानगर.
कोरोनापासून संरक्षण मिळावे तसेच सध्या काळात कोणत्याही आजाराला आपले शरीर निमंत्रण देणार नाही. त्यासाठी नियमित व्यायामाबरोबर आहारावर विशेष लक्ष आहे. माेसंबी, संत्रीच्या ज्युससह दिवसातून एकवेळा लिंबू शरबत घेतले जाते. त्यामुळे खूच आल्हाददायी वाटते. आपणही ज्युस अथवा लिंबू शरबताचे नियमितपणे सेवन करावे.- कृष्णा मंगनाळे, टिळकनगर, नांदेड.