नांदेड: लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.जिल्ह्यात १२ वाळू घाटावर उपसा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. त्यात उमरी तालुक्यातील कौडगाव, इंरडल, महाटी आणि नायगाव तालुक्यातील मेळगाव येथे परवानगीपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्याने हे घाट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण त्याचवेळी देगलूर व बिलोली तालुक्यात एप्रिल मध्ये वाळू उपशास सुरु झालेले घाट जुलैमध्येही सुरुच आहेत.क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू उपसा सुरु असल्याची बाब ‘लोकमत’ ने सोमवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी देगलूर आणि बिलोली तहसीलदारांना तालुक्यात सुरु असलेल्या वाळू घाटावर झालेल्या वाळू उपशाची तात्काळ मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बिलोली तालुक्यातील गंजगाव, माचनूर, सगरोळी, देगलूर तालुक्यातील सांगवीउमर, तमलूर या वाळू घाटावर आजही उपसा सुरूच आहे.देगलूर तालुक्यातील सांगवी उमर येथे १५११ ब्रास वाळू उपशाची परवानगी आहे. तमलूर येथे २ हजार ६५० ब्रास, बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे ६ हजार ५१९ ब्रास, माचनूर ६ हजार ९२६ ब्रास, सगरोळी घाटावरुन ३ हजार ११० ब्रासची परवानगी दिली होती. यंत्राचा वापर आणि तेलंगणा व कर्नाटकात जाणाºया वाळू वाहनांची संख्या पाहता दिलेल्या परवानगीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू उपसा झाल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या आदेशानंतर बिलोली आणि ेदेगलूरचे तहसीलदार वाळू घाटावर झालेल्या उपशाची मोजणी कधी करतील याकडे लक्ष लागले आहे.
वाळू घाटांवर मोजणी करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:25 AM
लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल