चौकट------------------
वैद्यकीय सल्याशिवाय एचआरसीटी तपासणी नाही
जिल्ह्यात कोरोनाचे निदान करण्यासाठी एचआरटीसी तपासण्या करण्यात येत आहेत. कोरोना सदृश्य रुग्णांची लक्षणे आढळून आल्यानतरही काही रुग्णांची माहिती प्रशासनकडे सादर केली जात नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. असे बाधित रुग्ण घरीच राहत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये अडचणी निर्माण येत आहेत. अनेकजण एचआरटीसी तपासणी ही डॉक्टरच्या प्रीस्क्रीप्शनशिवाय करत आहेत. ही बाब गंभीर असल्याचे नमुद करत यापुढे रेडिऑलॉजीस्ट यांनी एचआरसीटी तपासणी परस्पर करु नये. तसेच कोरोना आजाराचे निदान केलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता आदी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना उपलब्ध करुन द्यावी. अशा सेंटर्सवर अचानकपणे धाड टाकून तपासणी करण्यात येईल. आक्षेपार्ह आढळल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण प्रतिबंधात्मक अधिनियमानुसार कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.