नांदेड : शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.शहरातील कचरा उचलण्याचे काम आर अॅन्ड डी या ठेकेदारास देण्यात आले आहे. या ठेकेदाराकडून कचरा वाहनामध्ये चक्क दगड, माती टाकून त्याचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणानंतर तुप्पा डंपिंग ग्राऊंडच्या ठिकाणी ठेकेदाराकडून उचलण्यात आलेल्या कच-यामध्ये माती, दगड, विटा तसेच बिल्डींग मटेरियल आढळून येणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी कच-याची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.महापालिकेच्या विभाग प्रमुखांना एक दिवस तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर भेट देवून कच-याची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या आदेशानंतर एकाही अधिका-यांनी तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर भेट दिली नाही. अथवा कच-याच्या वजनाची फेरतपासणी केली नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.विभाग प्रमुखांनी तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर कंत्राटदाराकडून उचलण्यात आलेल्या घनकच-याचे संपूर्ण निरीक्षणासह तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत.एकूणच शहरातील कचºयाच्या वजनेप्रकरणात होत असलेली हेराफेरी आयुक्ताने गांभीर्याने घेतली आहे. आता आयुक्तांनी नियुक्त केलेल्या विभाग प्रमुखांचे वजनाबाबतचे फेर तपासणी अहवाल काय येतात व त्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
कचरा वजनाच्या फेरतपासणीचे आयुक्तांनी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:51 AM
शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देविभाग प्रमुख करणार तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर तपासणी