भीमगीतांचा कार्यक्रम
नांदेड : लोकनायक विचार मंचच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता त्रिपीटिका मैदान, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, भीमघाट याठिकाणी जलसाकार नागसेनदादा सावदेकर यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी प्रजासत्ताक पार्टीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड हे राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विकास गजभारे, बबन गजभारे आदींनी केले आहे.
भूगोल दिन साजरा
नांदेड : सिडको येथील इंदिरा गांधी महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने १४ जानेवारी रोजी भूगोल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऑनलाइन पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. रावसाहेब शेंदारकर, डॉ. सुरेश फुले, प्राचार्य डॉ. आर. पी. माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. एन. के. वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भागवत पस्तापुरे यांनी केले.
प्रशिक्षण शिबिर
नांदेड : जिल्हा मल्टिगेम्स ॲण्ड स्पोर्ट्स अकॅडमी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा लाठीकाठी खेळाचे ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. ज्या मुला-मुलींना या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नोंदणी २० जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत करावी, असे नांदेड जिल्हा मल्टिगेम्स ॲण्ड स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अवतारसिंग रामगडिया यांनी केले आहे.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
नांदेड : कुसुमताई चव्हाण डी. एड. कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या डॉ. ए. आर. राऊत, प्रा. जे. एस. पावडे, डॉ. एम. एन. अंबोरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. जे. ए. भोस्कर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आर. डब्ल्यू. नवघडे यांनी केले.