इलियास बावाणी।श्रीक्षेत्र माहूर : शहरासह माहूर तालुक्यात मुरवणी पाऊस न झाल्याने शेतवस्त्यांची उलंगवाडी होत असून नदी-नाले, कुपनलिका, विहिरी आटत चालल्याने तसेच माहूर तालुक्याची जीवनदायी पैनगंगा नदीचे पात्र महिनाभरात कोरडेठाक पडणार असल्याने आतापासूनच दुष्काळाचे चटके जाणवत आहेत़माहूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाºयात महिनाभर पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असल्याने शहराच्या दोन्ही बाजूस असलेल्या खांडाखोरी व गुंडवळ तलावाचे पाणी आरक्षित करून हे पाणी माहूर शहरात आणण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी आदींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शहरासह तालुक्यात ४० पेक्षा जास्त छोटे-मोठे तलाव असून एकही तलाव उपसला न गेल्याने सर्वच तलाव गाळपले. परिणामी पाणीसाठा अत्यल्प होत असून तालुक्याची पाणीपातळी खालावत आहे़ शहरासह खेड्यापाड्यातील विहिरी कुपनलिका, तलाव आटत असून पैनगंगा नदीपात्रात पाणी कमी होत असल्याने नदीकिनाºयावरील गावांच्या नदीपात्रातील उद्भव विहिरींच्या भरवशावर असलेल्या नळयोजना काटकसरीने पाणीपुरवठा करत शेवटच्या घटका मोजत आहेत़ आजमितीस एकाही खेड्यातून टँकरचे प्रस्ताव आले नसले तरी डिसेंबरअखेर प्रत्येक गावातून टँकरची मागणी होईल यात शंका नाही़ तालुक्यातील पाझर तलावाचे गाळ काढण्याचे काम हाती घेत पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावांत करणे काळाची गरज असून पैनगंगा नदीपात्रात हिंगणी, दिगडी, मोहपूरसारखे आणखी तीन बंधारे बांधणीचे काम लवकर हाती न घेतल्यास तालुक्यातून पाणी व रोजगाराअभावी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ऩप़ने उर्ध्व पैनगंगा विभाग आखाडा बाळापूर या विभागाकडे रक्कम भरून नदीपात्रात पाणी सोडण्याची विनंती केली असता पाईपलाईनद्वारे पाणी घ्या, नदीपात्रात खुले पाणी सोडता येणार नाही असे उत्तर आले आहे़
यावर्षी पैनगंगा नदीपात्रात खुले पाणी सोडता येणार नसल्याने ज्या गावांना पाणी पाहिजे, त्यांनी बंधा-यावरून पाईपलाईन टाकून पाणी घ्यावे़ यामुळे नदीपात्रात जिरणारे पाणी वाचविता येणार आहे-जगदीश सुर्वे,शाखा अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग, आखाडा बाळापूऱ