चौकट--------------------
काय आहेत लक्षणे?
लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षणे सध्या अतिशय सौम्य स्वरूपात दिसत आहेत. काही मुलांमध्ये तर ही लक्षणेही दिसत नाहीत. अनेकांचे आई-वडील व कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतरही मुलांमध्ये लक्षणे आढळत नाहीत. सौम्य स्वरूपाच्या लक्षणामध्ये अनेकांना ताप, सर्दी, खोकला हीच लक्षणे आढळून येतात. मात्र या आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास प्रौढांपेक्षा लहान मुलांना तो घातक ठरणार आहे. मुलांना मल्टिपल एम्प्लॉयमेंट्री सिंड्रोम होतो. त्यात थेट हृदयावर कोरोनाचा आघात होतो.
चौकट--------------------
काळजी घ्या... घाबरू नका
कुटुंबातील सदस्यांना कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांमध्ये लक्षणे दिसत नसली तरी त्याची कोरोना तपासणी तातडीने करून घ्यावी, मुलांच्या हृदयावर कोरोनाचा परिणाम होत असल्यामुळे पालकांनी लहान मुलांना सुरक्षित ठेवावे.
- डॉ. प्रमोद अंबाळकर, भावसार चौक, नांदेड
पतिक्रिया
मुलांनी कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क वापरणे, हात धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे. त्रिसूत्री मुलांसाठी आवश्यक आहे. लहान मुले हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नाहीत. मात्र ते इतरांना संसर्ग करू शकतात.
- बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड