शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
4
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
5
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
6
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
7
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
8
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
9
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
10
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
11
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
12
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
13
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
14
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
15
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
16
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
17
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
18
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
19
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
20
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

प्रवाशांची गैरसोय! आज राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोड, इगतपुरी स्थानकावर थांबणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 7:04 PM

ऐनवेळी रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या मार्गात बदल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नांदेड : नांदेड-सीएसटीएम राज्यराणी एक्स्प्रेसच्या (१७६११) मार्गात बदल करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी ही गाडी नाशिक रोड व इगतपुरी स्थानकावर न थांबता थेट सीएसटीएम रेल्वेस्थानकाकडे प्रस्थान करेल. पहाटे ६:१२ मिनिटाला ही गाडी नाशिक रोड तर ७:१३ मिनिटाला ईगतपुरी रेल्वे स्थानकावर पाेहचते. काही कारणास्तव १९ ऑक्टोबर रोजी सुटणारी ही रेल्वे या दोन्ही रेल्वे स्थानकावर थांबणार नाही. दररोज रात्री ८ वाजता सुटणारी नांदेड-सीएसटीएम राज्यराणी एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सीएसटीएम स्थानकावर पोहचते. या दरम्यान, १५ स्थानकांवर गाडीचा थांबा आहे. मात्र आज सुटणारी गाडी नाशिक आणि ईगतपुरी स्थानकावर थांबणार नाही, असे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सूूचित केले आहे.

नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसचे जुनेच वेळापत्रकगाडी क्रमांक (१७२३१) नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात १८ ऑक्टोबरपासून बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. परंतु हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस आपल्या जून्याच वेळापत्रकानुसार धावेल, यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे विभागाने कळविले. तेलंगण राज्यात असलेले नरसापूरहून ही ट्रेन प्रत्येक शुक्रवारी व रविवारी सकाळी ११:१५ वाजता स्थानकावरून सुटते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता ही गाडी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील नगरसोल स्थानकावर पोहचते. २५ स्थानकांवर ही गाडी थांबते. पहाटे ३:०५ मिनिटाला नांदेड स्थानकावर ही गाडी पाेहचते.

प्रवाशांची गैरसोयआदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस (१७४०९-१७४१०) १८ ऑक्टोबर रोजी मुदखेड-नांदेड-मुदखेडदरम्यान अंशत: रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ऐनवेळी रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या मार्गात बदल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर