लिनोझोलीडच्या दीर्घकाळ वापर करण्यासंदर्भातील नवीन पद्धती संशोधनाचे महत्त्वपूर्ण संशोधन डॉ. शैलेश वाढेर यांनी केले आहे. या त्यांच्या संशोधनाबद्दल भारत सरकारने त्यांना एकस्व प्रदान केले आहे. या त्यांच्या यशामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. भविष्यात प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्याकडून अजूनही समाजोपयोगी संशोधन होईल आणि त्याला एकस्व मिळेल अशी अपेक्षा कुलगुरू डाॅ.भाेसले यांनी व्यक्त केली.
एकस्व मिळविण्यासाठी पॅटलेक्स बिझनेस सोल्युशन्स, लातूरचे एकस्व तज्ञ विजयकुमार शिवपूजे यांचे योगदान मिळाले. डॉ. शैलेश वाढेर यांना एकस्वचे प्रशस्तीपत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, डॉ. राजाराम माने व डॉ. डी.डी. पवार उपस्थित होते.