शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वॉर्डात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे़ परिचारिकाही संपात ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा तीन दिवशीय संप : शासकीय रुग्णालयातील ८०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वॉर्डात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे़ परिचारिकाही संपात असल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत़विष्णूपुरी येथील रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण विभागात दिवसाकाठी जवळपास दोन हजारांवर रुग्ण येतात़ तर आंतररुग्ण विभागात दाखल होणा-या रुग्णांची संख्याही मोठी आहे़ या ठिकाणी यवतमाळ, परभणी, हिंगोलीसह शेजारील तेलंगणातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात़ रुग्णसेवेची सर्व भिस्त ही परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि डॉक्टरांवरच असते़ परंतु, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपात जवळपास ३५० परिचारिका, तांत्रिक विभागातील १४० कर्मचारी, लिपीकवर्गीय १२० आणि चतुर्थश्रेणीच्या १२० अशा एकूण ८०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे़ त्यामुळे या ठिकाणी असलेल्या सर्व वॉर्डामध्ये सकाळी अन् सायंकाळी राऊंडवर येणा-या डॉक्टरांची मोठी गैरसोय होत आहे़ कोणत्या रुग्णाला कोणत्या वेळी औषध, सलाईन किंवा इंजेक्शन द्यायचे याबाबत डॉक्टरही अनभिज्ञ आहेत़ त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे़ या ठिकाणी येणाºया रुग्णांना स्ट्रेचरवरुन वॉर्डात नेले जाते़ परंतु, स्ट्रेचर नेण्यासाठीही कर्मचारी नसल्यामुळे नातेवाईकांना अत्यवस्थ रुग्णांना अक्षरश: उचलूनच वॉर्ड गाठावा लागत आहे़ परिचारिका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींची प्रत्येक वॉर्डात नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे दिलासा मिळाला आहे़---संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून परिचारिका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींची प्रत्येक वॉर्डात नियुक्ती करण्यात आली आहे़ निवासी डॉक्टर, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्यावरही वॉर्डनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही़ महाविद्यालय व रुग्णालय प्रशासन रुग्णसेवेबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक वाय़एच़ चव्हाण यांनी दिली़

टॅग्स :NandedनांदेडagitationआंदोलनEmployeeकर्मचारीStrikeसंपhospitalहॉस्पिटल