नांदेड : भंडारा दुर्घटनेनंतर शहरातील रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेचा आता महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. नांदेड शहरात जवळपास साडेतीनशे रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामध्ये मोठी रुग्णालये जवळपास ५० आहेत. ज्या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्याची सोय आहे, तर प्राथमिक उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या २५० हून अधिक आहे. यातील ११० रुग्णालयांनी नियमितपणे अग्निशमन विभागाची एनओसी घेतली आहे, तर प्राथमिक उपचार करणारी लहान रुग्णालये अग्निशमनच्या एनओसीबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.
एनओसी न घेणाऱ्या रुग्णालयांचाही आता शोध घेतला जात आहे; पण आवश्यकता असताना एनओसी न घेणाऱ्या रुग्णालयावर मोठी कारवाई केली जाईल, असे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आरोग्य विभाग सुरक्षेबाबत गंभीर झाला आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट प्रक्रिया पूर्ण
शहरात जिल्हा रुग्णालयासह स्त्रीरोग रुग्णालय आहे. या शासकीय रुग्णालयातील जिल्हा रुग्णालयाची इमारत सहा महिन्यांपूर्वीच बांधण्यात आली आहे. फायर ऑडिटची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे, तर श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाचे फायर ऑडिट भंडारा दुर्घटनेनंतर सोमवारी करण्यात आले आहे.
बारा वर्षांत मोठी दुर्घटना नाही
शहरात जवळपास ३५० हून अधिक रुग्णालये कार्यरत आहेत. त्यासह शासकीय जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयही कार्यरत आहे. मागील दहा वर्षांत कोणताही अप्रिय प्रकार घडला नाही. आगीच्या घटनांसंदर्भात अग्निशमन विभागासह महापालिका, आवश्यक त्या सूचना वेळोवेळी दिल्या त्याचवेळी खाजगी रुग्णालायानेही अग्निशमन प्रतिबंधाबाबतच्या उपाययोजना केल्या.
शहरात साडेतीनेशहून अधिक रुग्णालये कार्यरत असली तरीही यात ५० मोठी रुग्णालये आहेत. ज्याठिकाणी उपचारासाठी ॲडमिट करून घेतले जाते. उर्वरित रुग्णालयात व प्राथमिक उपचार करून रुग्णांना साेडले जाते. त्यामुळे अशा लहान रुग्णालयांना अग्निशमन विभागाची एनओसी आवश्यक नाही. नियमितपणे दर दोन वर्षाला रुग्णालयांची संख्या १०० हून अधिक आहे. अशा रुग्णालयांची अग्निशमन दलाकडून नियमित तपासणी केली जाते. - रईस पाशा, अग्निशमन विभागप्रमुख