आता सायकलच वापरणार
सातत्याने पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोलवर एवढे पैसे खर्च करणे शक्यत नाही. यापुढे सायकलच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी घरीच उभी ठेवली आहे. सरकार पेट्राेल आणि डिझेलचे दर कमी करीत नसल्यामुळे महागाई वाढली आहे.
फक्त राजकारण सुरू
पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये फक्त राजकारण सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांशी कुणालाही देणेघेणे नाही. सातत्याने पेट्रोलचे दर वाढत असताना कोणत्याही सरकारला सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असे वाटत नाही.
खाद्यतेल १८० रुपये किलो
सर्वच प्रकारच्या किराणा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यात सोयाबीन तेल १६० रुपये तर शेंगदाणा तेल तब्बल १८० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे स्वयंपाकातील फोडणीही महागली आहे. त्यामुळे अनेक गृहिणींना घरात तेलाचा वापर कमी केला आहे.