पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत होऊन त्याद्वारे पोलीस कुटुंबीयांसाठी कल्याणकारी योजना राबविता येणार आहेत. या पेट्रोल पंपावर हिंदुस्थान पेट्रोलियमचे पेट्रोल मिळणार आहे. त्यासाठी या ठिकाणी चार मशीन ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मशीन महिलांसाठी राखीव आहे. तसेच या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनातील हवा तपासण्याची मोफत सुविधाही येथे आहे. पोलीस कर्मचारी कुटुंबीयांना सवलतीच्या दरात कॅन्टीन, गॅस एजन्सी, एलआयसी, पिठाची गिरणी, वाचनालय, आसना रेस्ट हाऊस, व्यायामशाळा, सुयोज पोलीस लॉन्स, प्राथमिक शाळा, रुग्णालय असे उपक्रम राबविले जातात.
बुधवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, आयुक्त डॉ. सुनील लहाने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, उपमहाप्रबंधक सत्यनारायण चप्पा यांची उपस्थिती होती.