लहुजी साळवे जयंती
बिलोली - लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीगुरू लहुजी रामजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर भाकपचे राष्ट्रीय सचिव प्रा.सदाशिव भुयारे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी भारत खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजि.भाऊसाहेब घाेडे होते. प्रास्ताविक प्रदीप वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राज सूर्यवंशी यांनी तर काळे, कांबळे, चंद्रकांत गुंडाळे, पांडुरंग गायकवाड, उत्तम हातागळे, चेतक काळे, बी.एस.घोनशेटवाड, उत्तम अंबेकर, प्रसाद गायकवाड, विशाल केदारे आदी उपस्थित होते.
तेजस्वीनी चमकली
इस्लापूर - येथील कन्या तेजस्वीनी राजे पाटील हिने वास्तूविशारद होण्याचा मान मिळविला. ती इस्लापूर येथील पहिली महिला वास्तूविशारद ठरली आहे. पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत तिने चांगले यश मिळविले. त्यापूर्वीचे शिक्षक ग्रामीण पॉलटेक्नीक तसेच गुजराती शाळेतून तिने घेतले होते.
ब्रम्होत्सव साधेपणाने
मुक्रमाबाद - येथील बालाजी मंदिराचा दहावा ब्रम्होत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सकाळी भगवान बालाजींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. नंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष तमाअप्पा गंदीगुडे, सुभाष बोधणे, अशोक वट्टमवार, संतोष पंचाक्षरे, शिवाजी पाटील, माणिक बंडगर, विठ्ठल जोशी, राजू खंकरे, गणेश वट्टमवार, अरुण वट्टमवार, बालाजी पांचाळ, योगेश वट्टमवार आदी उपस्थित होते.
खुरगाव येथे कविसंमेलन
नांदेड - येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने खुरगाव ता. नांदेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी कविसंमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी दिली. यामध्ये नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास धूतराज, माराेती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य, उषा ठाकूर, रंजीत गोणारकर, एकनाथ कार्लेकर आदी सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भंते पय्याबोधी थेरो यांनी दिली.
मोटार व पाईपची चोरी
कंधार - तालुक्यातील मसलगा शिवारातून मन्याड नदीवरील तीन स्टार्टर, चार लोखंडी पाईप, दोन व्हॉल्व असा एकूण २० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली. कंधार पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली. जमादार मस्के तपास करीत आहेत.
मुखेडमध्ये माकपची निदर्शने
मुखेड - शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध म्हणून माकपच्या वतीने ३ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ.विनोद गोविंदवाड, कॉ.अंकुश अंबुलगेकर, कॉ.माधव देशटवाड, कॉ.अंकुश माचेवार, कॉ.राजू पाटील, कॉ.अनिल पांचाळ, कॉ.रेणुका तुरेवाड, कॉ.शंकर घोडके, कॉ.लक्ष्मण गिरी, कॉ.पवन जगदमवार, कॉ.शिवा देवकत्ते, कॉ.पंढरी देशटवाड, कॉ.हणमंत भुरे आदी उपस्थित होते.