नांदेड- शहरातील भाग्यनगर भागातील एका कंत्राटदाराला पिझ्झाची ऑर्डर करणे चांगलेच महागात पडले असून 88 हजार 500 रुपये त्यांच्या खात्यातून लंपास करण्यात आले आहेत. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली.
सचिन पाटील या गुत्तेदाराने झोमॅटो अपवरुन पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यासाठी ऑनलाईन पैसे ही पाठवले होते. परंतु पिझ्झा आलाच नाही . त्यामुळे त्यांनी कस्टमर केअर ला फोन केला. कस्टमर केअरने त्यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून यूपीआय कोड अन खात्यासंदर्भात इतर माहिती पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी माहिती पाठविल्यानंतर त्यांच्या खात्यातून 88 हजार 500 रुपये लंपास करण्यात आले. या बाबत माहिती मिळताच पाटील यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.