लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत नांदेड शहराचा समावेश करण्यात आला असून शहरात हरित क्षेत्र विकासासाठी साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून महापालिका चक्क डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावणार आहे.अमृत योजनेअंतर्गत हरित क्षेत्र विकासासाठी २०१५-१६ साठी १ कोटी २ हजार ५२ रुपये, २०१६-१७ साठी दीड कोटी आणि २०१७-१८ साठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नाईकनगर, बीअँडसी कॉलनी आणि बोंढार ट्रिटमेंट प्लांट येथे १ कोटी २ हजारांची झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी २०१६-१७ च्या निधीतून महापालिका जुन्या नांदेडातील देवीनगर येथे जुने डम्पिंग ग्राऊंड, व्हीआयपी रोड, स्टेशनरोड आणि कॅनॉलरोड येथे दीड कोटींचे झाडे लावणार आहे. विशेष म्हणजे, या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दराने झाडे लावणे व हरित क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्राप्त झालेल्या सर्वात कमी दराच्या निविदाधारकाला काम न देता दुसºया क्रमांकाच्या निविदाधारकास महापालिकेने सदर काम दिले आहे. विशेष म्हणजे, सर्वात कमी दर असलेला कंत्राटदार हा तांत्रिकदृष्ट्या अपात्र असल्याचे कारण देत मनपाने त्याला या प्रक्रियेतून बाद केले व त्याच दराने दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या ठेकेदाराला काम बहाल केले आहे.२०१७-१८ च्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पातंर्गत विनायकनगर, टाऊन मार्केट, वात्सल्यनगर, काबरानगर, गणेशनगर, डंकीन पंपहाऊस येथे दोन कोटींची झाडे लावणार आहेत. या निविदा प्रक्रियेतही उपरोक्त पद्धतीनेच ठेकेदारास काम देण्यात आले आहे.या कामांना महापालिकेच्या स्थायी समितीने एकमुखाने मंजुरी दिली आहे. सभेमध्ये मंजुरी दिली असली तरी डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावण्याचा महापालिकेचा निर्णय आश्चर्यजनक ठरला आहे. त्याला स्थायी समितीच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर विरोधही दर्शविला आहे. यात माजी महापौर अब्दुल सत्तार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर यापूर्वी उद्यान उभारण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव गुंडाळून कचºयावरच झाडे लावण्याचा उद्योग केला जात असल्याची टीका सत्तार यांनी केली आहे.जागेचा केला अभ्यासअमृत योजनेअंतर्गत शहरात हरित क्षेत्र विकासासाठी राज्य शासनानेच सल्लागार नेमला होता. या सल्लागाराने अभ्यास करुनच डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित केली आहे. या ठिकाणी माती टाकून झाडे लावली जाणार असल्याचे उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा फरहतउल्ला बेग यांनी दिली. या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
नांदेड शहरात डम्पिंग ग्राऊंडवर लावणार झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:41 PM
केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत नांदेड शहराचा समावेश करण्यात आला असून शहरात हरित क्षेत्र विकासासाठी साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून महापालिका चक्क डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावणार आहे.
ठळक मुद्देसभागृहात मान्यता : बाहेर मात्र विरोध सुरुच