शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 1:29 PM

जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी प्रकल्पातून ७६.१५ क्युसेक विसर्ग जायकवाडीत ७२.४६, तर येलदरीमध्ये ९९.२९ टक्के साठा

- विशाल सोनटक्के 

नांदेड : बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प वगळता इतर प्रमुख धरणांत यंदा समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने मराठवाडा सुखावल्याचे चित्र आहे.  दरम्यान, यंदा पावसाने प्रमुख प्रकल्प परिसरातही चांगलीच मेहेरबानी दाखवली आहे. जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे.

जायकवाडी प्रकल्पात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७२.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा २१७१ दलघमी आहे. शुक्रवारपर्यंत या प्रकल्पात १५७३.०९ इतके पाणी उपलब्ध होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा-येलदरी प्रकल्प तुडुंब भरला असून या धरणात ९९.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी या धरणक्षेत्रात २१ आॅगस्टपर्यंत ४१३ मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा याच तारखेपर्यंत ६१० मि.मी. पाऊस कोसळला आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ८१० दलघमी असून शुक्रवारपर्यंत येथे ८०४.०३ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने धरणातून ४७७.९८ क्युमेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण क्षेत्रात मागीलवर्षी २१ आॅगस्टपर्यंत केवळ २७० मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा ६५६ मि.मी. पाऊस नोंदविला गेला असून शुक्रवारपर्यंत या धरणात ७१.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३१२ दलघमी आहे. शुक्रवार सकाळपर्यंत येथे २२३.७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. 

नांदेड जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प परिसरात मागील वर्षी ६५३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा या प्रकल्प क्षेत्रात ७९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शुक्रवारपर्यंत प्रकल्पात ८३.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. या प्रकल्पाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ९६४ दलघमी असून शुक्रवारी सकाळपर्यंत येथे ८०१.१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. 

बीड जिल्ह्यातील मांजरा या प्रकल्प क्षेत्रातही यंदा सुमारे दुप्पट पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षी २१ आॅगस्टपर्यंत या परिसरात १६८ मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा तेथे ३१६ मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, धरण अद्यापही कोरडे असून सद्य:स्थितीत तेथे ०.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाची प्रकल्पी उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७७ दलघमी असून शुक्रवारपर्यंत तेथे १.०६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. 

पूरप्रवण भागावर प्रशासनाचे लक्ष- नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्पाची संकल्पित उच्चत्तम स्थिती ३५५ मीटर असून, शुक्रवारी सकाळपर्यंत तेथे ३५४ मीटर पाणीपातळी होती. त्यामुळे या प्रकल्पातून ७६.१५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. मराठवाड्यातील इतर पूरप्रवण ठिकाणावरही प्रशासन लक्ष ठेवून आहे.- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील गोदावरीची इशारा स्थिती ४४०.४१ मी. आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत तेथे ४३२.२१ मी. पाणी होते. - बीड जिल्ह्यातील माजलगाव, तेलगाव रोड येथील सिंदफणा नदीची इशारा स्थिती ४१० मी. आहे. तेथे ४०२.८३ मी. वरून पाणी वाहत आहे. - परभणी जिल्ह्यातील धालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा स्थिती ३९६.४७ आहे. सध्या तिथे ३८६.५८ मीटर पाणीपातळी आहे. - नांदेडच्या गोदावरीवरील जुन्या पुलाची इशारा स्थिती ३५१ मीटर असून तेथे ३४३.१५ मीटरहून शुक्रवारी सकाळी पाणी वाहत होते. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसWaterपाणीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद