नांदेड : यंदा पहिल्याच पावसात नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे आज सकाळी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. 471 क्युमेंक्स वेगाने गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात असलेल्या परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला होता. प्रशासनाने नदीकाठावरील गावांनासतर्कतेचा इशारा दिला होता. रविवारी सायंकाळी प्रशासनाने दरवाजा उघडण्याची रंगीत तालीम केली होती. सोमवारी सकाळी प्रकल्पाचा सात क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. सध्या गोदावरी पात्रात 471 क्युमेंक्स वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.