लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :शहरातील दत्तनगर भागात पोहेकॉ़शिवाजी शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून आरोपी तुळजासिंह उर्फ मुन्ना कन्हैयासिंह ठाकूर याने ४ फेब्रुवारी रोजी खून केला होता़ घटनेला आता पाच महिने उलटत आले आहेत़ परंतु अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही़ याबाबत न्यायालयाने २६ एप्रिल रोजी आरोपीने न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान सोडले होते़ आता या प्रकरणाचा तपासही थंडबस्त्यात गेल्याचे दिसून येत आहे़दत्तनगर भागात पोहेकॉ़शिवाजी शिंदे आणि आरोपी तुळजासिंह यांच्यामध्ये वाद होता़ ४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिंदे हे लॉन्ड्रीवर कपडे टाकण्यासाठी जात असताना, मागाहून आलेल्या तुळजासिंहने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली होती़ त्यानंतर आरोपी एका दुचाकीवरुन पळाला़ या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़आरोपी तुळजासिंहचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके नियुक्त केली होती़ या पथकांनी शेजारील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोपीचा शोध घेतला़ परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नाही़ त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ८२ नुसार कार्यवाहीसाठी अहवाल पाठविला होता़ त्यानंतर मात्र पोलिसांकडून या प्रकरणात तपासाला म्हणावी तशी गती मिळाली नाही़या घटनेला आता पाच महिने लोटत आले आहेत़ या प्रकरणाची तपास पथके आता इतर गुन्ह्याच्या शोधाला लागली आहेत़ त्यामुळे पोलिसाचा मारेकरी कधी सापडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे़दरम्यान, गेल्या काही दिवसात आरोपींकडून पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ किरकोळ कारणावरुन हे हल्ले होत आहेत हे विशेष़
नांदेड शहरात पोलिसाचा मारेकरी सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:05 AM
शहरातील दत्तनगर भागात पोहेकॉ़शिवाजी शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून आरोपी तुळजासिंह उर्फ मुन्ना कन्हैयासिंह ठाकूर याने ४ फेब्रुवारी रोजी खून केला होता़ घटनेला आता पाच महिने उलटत आले आहेत़ परंतु अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही़ याबाबत न्यायालयाने २६ एप्रिल रोजी आरोपीने न्यायालयात हजर राहण्याचे फर्मान सोडले होते़ आता या प्रकरणाचा तपासही थंडबस्त्यात गेल्याचे दिसून येत आहे़
ठळक मुद्देपाच महिने लोटले : प्रकरणाचा तपासही थंड बस्त्यात