नांदेड : माळाकोळी (ता. लोहा) येथील पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांत हाणामारी झाली. या वेळी ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमरेही फोडण्यात आले. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकावरही बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.माळेगाव विश्रामगृहात पोलिसांनी पार्टी केली. तेथून हा वाद सुरू झाला. माळाकोळी चौकीजवळ हाणामारी झाली. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. तेथेही सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले. हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला असून निलंबन कारवाईनंतर प्रकरणाला वाचा फुटली. या घटनेची चित्रफित कुणीतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी सहायक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाण यांना हे प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याचा ठपका ठेवून, तसेच हाणामारी करणारे पोलीस अनिल वाघमारे व साईनाथ स्वामी यांना निलंबित केले. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यातच पोलिसांत हाणामारी
By admin | Published: March 30, 2017 3:44 AM