शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 11:33 AM

Polices dream of a house गेल्या साडेतीन वर्षांपासून पाेलिसांची ही कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देबँकांमार्फत कर्जाला विराेधघरबांधणी लांबणीवर पडणार

नांदेड : राज्यातील पाेलिसांना आधीच गेल्या साडेतीन वर्षांपासून गृहकर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यातही हे कर्ज आता बँकांमार्फत दिले जाणार असल्याने पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Polices dream of a house will get stuck in the rules of banks )

राज्यातील पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरासाठी पाेलीस गृहनिर्माण मंडळामार्फत कर्ज दिले जाते. जेवढे अंदाजपत्रक सादर केले तेवढी पूर्ण रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. आधी कर्जाच्या मुद्दल रकमेची व नंतर व्याजाची रक्कम वसूल करण्यात येते. परंतु गेल्या साडेतीन वर्षांपासून पाेलिसांची ही कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. सर्व पाेलिसांचा डीजी लाेनसाठी आग्रह आहे. मात्र, त्यातून ताेडगा निघताना दिसत नाही. निधीची अडचण हे कारण त्यामागे सांगितले जाते.

राज्याचे पाेलीस महासंचालक संजय पांडे हे कर्ज तातडीने मिळावे यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, आर्थिक तरतुदीचा विषय येत असल्याने त्यांनाही हा पेच साेडविण्यात विलंब लागताे आहे. त्यावर पर्याय म्हणून आता बँकांकडून साडेपाच टक्के दराने पाेलिसांना गृहकर्ज मिळवून देता येते का यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बँकांमार्फत मिळणाऱ्या या कर्जाला पाेलिसांचा विराेध आहे. या कर्जात पुन्हा बँकांची जाचक नियमावली अडसर ठरण्याची भीती आहे.

खर्चाचा ताळमेळ बसविताना कसरत.....डीजी लाेन अंदाजपत्रकानुसार पूर्ण दिले जात हाेते. मात्र, बँका मागणीच्या ७० ते ८० टक्केच कर्ज देतात. त्यातही घरबांधणीच्या तीन टप्प्यांवर हे कर्ज दिले जाते. शिवाय या कर्जाचे व्याज साेबतच वसूल केले जात असल्याने मासिक हप्ताही वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मिळणाऱ्या पगारात आवक व खर्चाचा ताळमेळ बसविताना पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसState Governmentराज्य सरकारNandedनांदेड