शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

मराठा आरक्षण मिळाल्यास या! राजकीय नेत्यांना पुन्हा गावबंदी, मेंढल्यात पदाधिकाऱ्यांना अडविले

By श्रीनिवास भोसले | Published: January 22, 2024 7:26 PM

आरक्षण मिळालं की तुम्ही हक्कानं या स्वागत करू...

नांदेड: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कुच करत असतानाच गावागावात आता राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली जात आहे. यापूर्वी केलेली गावबंदी मागे घेतली होती. परंतु, आंदोलनकर्ते जसजसे मुंबई जवळ करत आहेत, तसतसे गावातील वातावरणही तापत आहे. अर्धापूर तालुक्यातील मेंढला बु. येथे गेलेल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेश नाकारून माघारी पाठविले.

आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी गावात जाऊन गावकऱ्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर पोलिस पाटील म्हणून निवड झालेल्यांचा सत्कार, विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा नेते मंडळींनी सुरू केला आहे. सोमवारी अर्धापूर तालुक्यातील मेंढला बु. येथे एका राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी गेले असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही बैठक न घेता माघारी परतावे लागले. जरांगे पाटील मुंबई जवळ करत असताना आता गावागावात राजकीय नेत्यांनी कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमदार, खासदा, मंत्री यांना गावापासून चार हात दूर रहावे लागेल, असे चित्र दिसत आहे.

आरक्षण मिळालं की तुम्ही हक्कानं या स्वागत करू...मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लाऊन मुंबईकडे निघाले आणि तुम्ही पक्षाच्या कामासाठी गावात येता. आम्हाला कोणताही पक्ष नाही. त्यामुळे विनंती करतो, तुम्ही गावात येवू नका असे खडेबोल मराठा बांधवांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना सुनावले. आरक्षण मिळेपर्यंत गावात येवू नका, आरक्षण मिळाले की या आम्हीच तुमचे स्वागत करू, असे आवाहनदेखील मराठा बांधवांनी या राजकीय नेत्यांना केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड