नांदेड - नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७:३० ते ११ या वेळेत १८ टक्के मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी होईल. बुधवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान सुरू झाले. मतदानासाठी २,५०० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या आहेत.
१३७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. विविध पक्षांचे ४२३ तर १५५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात पहिल्यांदा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे.
प्रभाग २मधील ३७ मतदान केंद्रांवर या मशिन्स बसविल्या जाणार असून, मतदारांना व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान बघायला मिळणार आहे. निवडणुकी दरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर करण्यात येत आहे.