मालेगाव : नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे टँकर मधून नागरिकांना मंगळवारी पाण्यात चक्क चाटू आढळून आले. संतप्त ग्रामस्थ यांनी पाणी घेण्यास नकार दिला. दूषित पाणी पुरवठा कसा झाला याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली. गट विकास अधिकारी यांनी नांदुसा येथे येऊन टँकर मधील दूषित पाण्याची पाहणी करून या बाबत चा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे मागील काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गावाला प्रशासनकडून टँकर द्वारे पाणी पुरवठा होत आहे.विशेष म्हणजे नांदेड शहरातील जळकुंभातुन टँकरमधून पाणी पुरवठा होत आहे़ ३० एप्रिल रोजी नागरिकांना टँकर मधील पाण्यात चक्क चाटू आढळून आले. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने हे पाणी आरोग्यास धोकादायक ठरू शकते म्हणून नागरिकांनी टँकर चे पाणी घेण्यास नकार दिला. पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना घटनास्थळी बोलविले व टँकर चे पाण्याची पाहणी करण्यास भाग पाडले. गट विकास अधिकारी यांनी नांदुसा येथील दूषित पाण्याची चौकशी करून तसा अहवाल कारवाई साठी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. दूषित पाणी पुरवठा कडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हेच दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. याचे गांभीर्य मात्र प्रशासनाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत आहेत.पाण्यात आढळले चाटूनांदेड शहरातील जळकुंभातुन टँकरमधून पाणी पुरवठा होत आहे़ ३० एप्रिल रोजी नागरिकांना टँकर मधील पाण्यात चक्क चाटू आढळून आले. हे पाणी आरोग्यास धोकादायक ठरू शकते म्हणून नागरिकांनी टँकरचे पाणी घेण्यास नकार दिला.
नांदुसा येथे टँकर मधून दूषित पाणी पुरवठा झाला आहे.मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे याबाबत महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत-समृद्धी दिवाणे, गटविकास अधिकारी, प.स.नांदेडनांदुसा येथे टँकर मधून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थनी माहिती दिली. पंचायत समितीच्या स्तरावरून अधिकारी यांनी कार्यवाही केली आहे-सुखदेव जाधव, सभापती, प.स.नांदेडमागील तीन दिवसापासून गावात टँकर मधून दूषित पाणी पुरवठा होत आहे. मंगळवारी सकाळी चक्क टँकर च्या पाण्यात चाटू आढळून आले. हे पाणी आमच्या आरोग्यास धोकादायक आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे- मल्लिकार्जुन जनकवाडे, नागरिक, नांदुसा़