ठळक मुद्देआंदोलकांनी काळे रुमाल अंगावर परिधान करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
नांदेड: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नांदेडमध्ये आक्रमक झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
काळे रुमाल अंगावर परिधान करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडल्याचा आरोप छावा संघटनेने केला. आजवर आम्ही शांतपणे आंदोलने केली मात्र आता आरक्षणासाठी मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल असा इशारा छावाचे प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, छावा जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे पाटील, श्याम पाटील वडजे, स्वप्नील पाटील रातोळीकर, स्वप्नील सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.