सेवानिवृत्ती निमित्त निरोप
हदगाव - सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पी.वाय.जाधव यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेगावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक कदम, सहशिक्षक खंडाळे, शिंदे, चव्हाण, लोणे, झाडे, शा.व्य.स.चे अध्यक्ष विद्यानंद जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष राजू पाटील, गजानन जाधव, मंचक माने, गोविंद वाड, इंदिराबाई माने आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृती केंद्राचे उद्घाटन
भोकर - मोघाळी येथे राज विद्या प्रतिष्ठानच्या वतीने देवबाप्पा वाचन संस्कृती संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राचे उद्घाटन महंत कृष्णदास बाबा मोघाळीकर यांच्या हस्ते झाले. मनोज चव्हाण, बालाजी नारलेवाड, दिगंबर पाटील, रावसाहेब पाटील, दत्तराम कदम, शंकरराव पाटील, आनंदराव अनंतवाड, साई पाटील, किशनराव यलमगोंडे आदींनी या उपक्रमाचे स्वागत केले.
शांतता समितीची बैठक
नायगाव - कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने बरबडा येथे ग्रामपंचायत इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर धुमाळ, सपोनि करीम पठाण, जमादार नागोराव पोले, आऊलवार, माजी सरपंच बालाजी मद्देवाड, भास्करराव धर्माधिकारी, दिलीपराव धर्माधिकारी आदी उपस्थित होते. आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन धुमाळ यांनी यावेळी केले. यावेळी आनंदा पोतनवाड, गंगाधर मद्देवाड, बाबू शिंगेवाड, सुलतान सय्यद यांनी धुमाळ व पठाण यांचा सत्कार केला.
आंतरराष्ट्रीय परिषद
मुखेड - ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने रसायनशास्त्र - समाजासाठी, औद्योगिकीकरणासाठी व तंत्रज्ञानासाठी या विषयावर २० व २१जानेवारी रोजी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ.उद्धव भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष किशनराव राठोड, सचिव प्राचार्य गंगाधर राठोड उपस्थित राहणार आहेत. यावेळी देशविदेशातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेसाठी प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, आयोजक डॉ.संजीव रेड्डी, विभाग प्रमुख प्रा.अरुणा इटकापल्ले, आयोजक सचिव प्रा.देवीदास पवार आदी परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थ्यांकडून गाव स्वच्छ
उमरी - तालुक्यातील पळसगाव तांडा येथील अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. दहावी व बारावीतील गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
सपोनि पुरी रूजू
बिलोली - तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्यात नूतन सपोनि म्हणून महादेव पुरी यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे शिंदे यांची नांदेडला बदली झाली होती. पुरी यांनी यापूर्वी लातूर, औरंगाबाद शहर येथे कर्तव्य बजावले आहे.
व्यसनमुक्तीचा निर्धार
लोहा - तालुक्यातील मारतळा गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला. १ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. यावेळी माधुरी मलदोडे, जयश्री बोराळे, देवबा होळकर, रमेश हणमंते आदी उपस्थित होते.
वृद्धाश्रमात ज्येष्ठांचा वाढदिवस
किनवट - येथील संथागार वृद्धाश्रमात दोन ज्येष्ठ महिलांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आकांक्षा आळणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या आश्रमात आठ महिला व दोन पुरुष आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, अरुण आळणे, किशन भोयर, कचरू जोशी आदी उपस्थित होते.