आरळी : तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. वरील गावांसह परिसरातील बºयाच गावांत उच्चदाब विद्युत पुरवठा बंद आहे.चिरली, पिंपळगाव (कु), डौर, गुजरी, कौठा, हज्जापुर, का-हाळ आदी गावांत ३ जून रोजी रात्री झालेल्या वीजपुरवठ्याअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून पाण्याविना लोकांचे बेहाल होत आहेत. मुक्या जनावरांसमोर चा-याचा प्रश्न असताना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महावितरणकडून अधूनमधून सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असून तो पुरेसा नसल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. जवळच असलेल्या कुंडलवाडी विद्युत उपकेंद्राने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उच्च दाब विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्याची मागणी चिरलीचे सरपंच अशोक दगडे, गुजरीचे सरपंच कमळबाई नरवाडे, कौठा येथील सरपंच गोदावरी चेंडे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ चव्हाण, साहेबराव सोनकांबळे, नागरिक विजय नरवाडे, किशनराव ढगे, बसवेश्वर साखरे, संभाजी चेंडे, काशीनाथ साखरे आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कुंडलवाडीचे उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरची कामे होत नाहीत.जवळपास ९० खांब वाकले तर १५ खांब तुटले आहेत़ सिमेंटचे १२० खांब तुटले असून जवळपास १५० खांब वाकले आहेत. कर्मचारी सकाळी आठपासून रात्री दहापर्यंत काम करत आहेत. तरीही आमच्याकडे मनुष्यबळ कमी पडत आहे. म्हणून देगलूर विद्युत विभागातील जास्तीचे कर्मचारी आम्ही बोलावले असून पुढच्या दोन ते तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.उप कार्यकारी अभियंता म्हणतात...उपकार्यकारी अभियंता पांडवे म्हणाले, आमच्याकडे चोवीस गावे व कुंडलवाडी शहर आहे आणि कुंडलवाडी शहरामध्ये तीन पाळीमध्ये चार ते पाच कर्मचारी लागतात. चोवीस गावांसाठी तीनच कर्मचारी असल्यामुळे एकदाच सर्वच फिटरचे काम होत नाहीत. जवळपास ११ के.व्ही.चे ९० खांब वाकलेले आहेत. आणि १५ खांब तुटलेले आहेत़
बारा दिवस उलटूनही वीजपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:34 AM
तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही.
ठळक मुद्देसोमवारच्या वादळी वाऱ्याचा फटका अनेक गावांत उच्च विद्युत पुरवठा बंद