मंगळवारी काढलेल्या बदली आदेशात चार पोलीस निरीक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १६ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत देशपांडे यांना शहर वाहतूक शाखा सोपविण्यात आली आहे, तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना अर्धापूर ठाण्याचा पदभार, संतोष तांबे यांना लोहा आणि मोहन भोसले यांना उमरी ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे.
निमगाव ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे, तर भोकर येथील शंकर डेडवाल यांना इस्लापूर ठाण्यात पाठविण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील रसूल तांबोळी यांना भोकर, संजय निलपत्रेवार यांना वजिराबाद आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांची नियंत्रण कक्षातून लिंबगाव ठाण्यात बदल झाली.
मंगळवारी काढलेल्या बदली आदेशात ११ पोलीस उपनिरीक्षक आता विविध ठाण्यांमध्ये जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यामध्ये बालाजी गाजेवार यांना विमानतळ सुरक्षा विभाग, रेखा काळे यांना लोहा ठाणे, गजानन अन्सापुरे यांना मुखेड, बालाजी किरवले यांना तामसा, रवि बुरकुले यांना विमानतळ ठाणे, श्रीकांत मोरे यांना देगलूर, माधुरी यावलीकर यांना मुदखेड, महेश कोरे आणि विजय पाटील यांना नांदेड ग्रामीण, श्रीधर तरडे यांना नक्षलविरोधी पथक, तर लहू घुगे यांना भाग्यनगर ठाण्यात नियुक्ती दिली आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यातील शेख जावेद यांना विमानतळ ठाणे, वजिराबाद येथील सौमित्रा मुंढे यांना भाग्यनगर, नक्षलवादीविरोधी पक्षातील मिथुन सावंत यांना किनवट ठाणे, शिवाजीनगर ठाण्यातील गंगाधर लष्करे यांना नियंत्रण कक्षात आणि अर्धापूर ठाण्यातील कल्याण मांगूळकर यांची धर्माबाद ठाण्यात बदली झाली.