नांदेड : पंतप्रधाननरेंद्र मोदी हे मंगळवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष विमानाने नांदेड विमानतळावर दाखल होणार आहेत़नांदेड येथून ते तेलंगणा येथे निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत़ पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे़ विशेष सुरक्षा पथके काही दिवसांपूर्वीच नांदेडात दाखल झाली.तेलंगणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी जाहीर सभा आहे़ त्यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजता विशेष विमानाने नांदेड विमानतळावर दाखल होतील़ काहीवेळ विमानतळावर थांबल्यानंतर हेलिकॉप्टरने ते तेलंगणाकडे रवाना होणार आहेत़ त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच एसपीजीचे अधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले होते़ शासकीय विश्रामगृहातील सर्व आरक्षण प्रशासनाने रद्द केले आहे़शासकीय विश्रामगृह सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे़ सोमवारी सकाळी स्थानिक पोलीस व एसपीजी अधिकाºयांनी रंगीत तालीम करीत सुरक्षेची पाहणी केली़ शहरात पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावले आहेत.
पंतप्रधान मोदी आज नांदेडमार्गे तेलंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:10 AM