नांदेड : मुखेड येथील यशवंतराव चव्हाण निवासी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम बसवंतराव पांचाळ यांना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.मुखेडच्या अपंग विद्यालयातील एका सहशिक्षिकेला शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढवून आणण्यासाठी व त्यांचे रोखलेल्या वेतनबिलाची रक्कम, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम मिळवून देण्यासाठी १ लाख ७0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत सहशिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. त्यानंतर या प्रकरणात २0 फेब्रुवारी रोजी मुखेड पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक तुकाराम पांचाळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात ३ मार्च रोजी पांचाळ यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली./(प्रतिनिधी)
■ जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळाच्या नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयातील एका विद्यार्थिनीवर बलात्काराच्या प्रकरणात सीसीटीव्हीचे पुरावे नष्ट करणे, विद्यार्थींने तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब समाजकल्याण विभागाच्या तपासणीत आढळली होती. या प्रकरणात समाजकल्याण विभागाने शाळा बंद करण्याची कारवाई केली होती. > त्यानंतर समाजकल्याण विभागाने देगलूरच्या उपविभागीय अधिकार्यांना संस्थाचालक पांचाळ, सचिव व मुख्याध्यापकांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याबाबत ४ फेब्रुवारी रोजी दिले होते. या पत्राला एक महिन्याचा काळ उलटला आहे. परंतु अद्यापही पोलिसांची कारवाई गुलदस्त्यातच आहे.