शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

मुखेड - नांदेड महामार्गावर खाजगी बस उलटली; १७ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 5:41 PM

अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

मुखेड (नांदेड): मुखेड- लातूर राज्य महामार्गावर सावरगाव पी.लादगा गावाजवळ पुणे ते नर्सी जाणारी खाजगी बस ( क्रमांक एम.एच.२० डी डी ७७०७ ) आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी असून दोघे गंभीर जखमी आहेत. मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमींना नांदेडला हलवले आहे.अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

एक खाजगी बस पुण्याहून मुखेड मार्गे नर्सीकडे निघाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या खाली उलटली. सावरगाव पी. येथील ग्रामस्थांनी तत्काळ  मदतीसाठी धाव घेतली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक रमेश वाघ, पोलिस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे, पोलिस उप नि.भारत जाधव यांनी भेट घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात रवाना केले. 

वैद्यकिय अधिक्षक डाॅ किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष टाकसाळे, डाॅ. व्ही.टी.शेटवाड ,डाॅ. उमाकांत गायकवाड, मालती वाघमारे,बीजला फत्तेलष्कर ,वैषाली कुमठेकर, मनीषा पुंडे,तुलसी नाईक, नंदा सोनकांबळे,वर्षा पांचाळ,धम्मशिला मोडक,आश्वर्या जमादार, तुकाराम पाये, भिमराव गायकवाड, अभिनंदन पांचाळ, प्रशांत बनसोडे, अमर सुर्यवंशी यांनी उपचार केला.

जखमींची नावे अशी राहुल वाघमारे  ३५ रा.आलुवडगाव आणि विमलबाई मारोती नरवाडे ( ५०)  ही दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे नांदेड येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर प्रणिता कदम १५ दुगाव, बालाजी कदम ५० दुगाव,लायक पठाण ३५ धामनगाव, लक्ष्मी पंदिलवाड २३ सगरोळी, विनोद जोंधळे २६ लालवंडी, सागरबाई जोंधळे ६० लालवंडी,इसुफ शेख ५४ चैनपुर, धुरपता गवते ५० कोंडलवाडी, साईनाथ मुंगडे ५० मंडलापुरकर, अंजनाबाई जाधव ४०, आदिती लोंडे १० दुगाव, सागरबाई कदम ४० अौराळ,अनिल इंगोले २५ आलुवडगाव , वनिता तोटरे ३५ धामनगाव, योगेश नरवाडे २१ सावरखेडा हे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड