नांदेड : नवीन मोबाईलची सेटिंग करून देण्याच्या नावाखाली त्यातील डेटा चोरी करून तो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या मोबाईल शॉपी चालकाच्या विरोधात वकील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १० फेब्रुवारी रोजी एका वकील महिलेने फुले मार्केट येथील अरिहंत मोबाईल शॉपीमधून नवीन मोबाईल खरेदी केला होता़ यावेळी आशिष डावळे याने मोबाईलची सेटिंग करून देतो म्हणून महिलेच्या मोबाईलमधील डेटाची चोरी केली़ त्यानंतर महिलेला फोनवर अनेक वेळा संपर्क साधला़ महिलेने बोलण्यास नकार दिल्यानंतर मोबाईलमधून चोरी केलेला डेटा सोशल मीडियावर वायरल करण्याची तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ या प्रकरणाचा तपास पो़नि़ नरुटे हे करीत आहेत़.