नांदेड : महापालिकेच्या महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रकाशकौर खालसा आणि उपसभापतीपदी आर्शिया बेगम मो. हबीब यांची बिनविरोध निवड झाली.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवारी महिला व बालकल्याण समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. सभापतीपदासाठी प्रकाशकौर खालसा आणि उपसभापतीपदासाठी आर्शीया बेगम यांचेच अर्ज बुधवारी प्राप्त झाले होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे गुरुवारी निवडीची औपचारिकता राहिली होती.सकाळी १० वाजता या निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. ११ वाजता सभापती निवडीची घोषणा पिठासीन अधिकारी डोंगरे यांनी केली. यावेळी समितीच्या सदस्या चित्रा गायकवाड, गितांजली कापुरे, सविता बिरकले, कविता मुळे, संगीता पाटील, जयश्री पवार, सलीमा बेगम नुरुल्ला खान, अपर्णा नेरलकर, शांताबाई गोरे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांची उपस्थिती होती.या निवडीनंतर डोंगरे यांच्यासह महापौर शीला भवरे, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले आदींनी नूतन सभापती आणि उपसभापतींचे स्वागत केले.
प्रकाशकौर खालसा, आर्शिया बेगम यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:27 AM
महापालिकेच्या महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रकाशकौर खालसा आणि उपसभापतीपदी आर्शिया बेगम मो. हबीब यांची बिनविरोध निवड झाली.
ठळक मुद्देमहिला व बालकल्याण समिती निवड