शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

साई भक्तावर काळाचा घाला; अर्धापूर येथील डॉक्टरचे औरंगाबाद येथे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 7:00 PM

गंगापूर- वैजापूर रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावर उभ्या नादुरुस्त ट्रकवर

अर्धापूर ( नांदेड ) : गंगापूर- वैजापूर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावर उभ्या नादुरुस्त ट्रकवर ( एमएच.०४ ईबी.६७१२) अर्धापूर येथून शिर्डीला जाणारी कार ( एमएच. ४६, डब्लू ७७३१ ) पाठीमागून धडकली. त्याचवेळी नाशिकहून औरंगाबादकडे जाणारी कार ( एम.एच २० एफ.जी. ०४०२ ) ही अपघातग्रस्त कारला धडकली. एकामागून एक दोन कार धडकून झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. डॉ. कैलास हेंबाडे ( मनाठकर ) असे मृताचे नाव आहे. 

तालुक्यातील पार्डी म. येथे आरोग्य सेवा देत विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेणारे डॉ. कैलास हेंबाडे ( मनाठकर ) हे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना त्यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. सदर अपघात गंगापूर- वैजापूर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यापैकी डॉ. कैलास हेंबाडे ( ४५ ह.मु पार्डी ता.अर्धापूर ) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोविंद शंकर भांगे व मुलगा साईनाथ गोविंद भांगे, सूर्यकांत बंडाळे व मुलगा प्रेम सूर्यकांत बंडाळे, करन दिनकर पवार, प्रदीप बसवंते आदी जखमी झाले.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात