नांदेड - यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. एकनाथ गोविंदराव मिरकुटे यांना ‘माहितीचा अधिकार आणि सुशासन : नांदेड जिल्हा परिषद : एक अभ्यास’ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली आहे. त्यांना प्रा. डॉ. आर. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, उपप्राचार्य प्रा. गोविंद किन्हाळकर, पर्यवेक्षक प्रा. एस. बी. चव्हाण, जीनियस बॅचचे पर्यवेक्षक प्रा. पी. पी. चव्हाण, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अजय गव्हाणे, प्रा. डॉ. कविता सोनकांबळे, प्रा. व्ही. जी. स्वामी, प्रा. ओमप्रकाश गुंजकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा. एकनाथ मिरकुटे यांना पीएच. डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:43 AM