शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा आवश्यक

By admin | Published: November 05, 2014 1:27 PM

जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे.

नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे प्रयत्न सुरू असताना या अंगणवाड्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे. अंगणवाड्यांच्या दर्जात गुणात्मक सुधारणा करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केली.

जिल्ह्यात ३५२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अर्धापूर तालुक्यातील ५१ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुसर्‍या टप्प्यात ५२ अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ५२ अंगणवाड्यांची आज मंगळवारी जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. उद््घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी यु. टी. तोटावाड, नाईक, श्रीमती गिरगावकर, पांडलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटकीय भाषणात काळे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या आयएसओ होणार नाहीत, ही वास्तविकता आहे. पण त्या बोलक्या झाल्या पाहिजे याची खबरदारी घ्यावी असे ते म्हणाले. यातून विद्यार्थ्यांना अंकगणित, मुळाक्षरे असे प्राथमिक ज्ञानतरी मिळणे आवश्यक आहे. प्रास्ताविकात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून २0१३-१४ मध्ये राबविलेल्या कुपोषणमुक्त गाव मोहिमेच्या यशस्वीतेबाबत सांगताना आयएसओ मानांकनातही जिल्हा चांगली कामगिरी बजावेल असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्याने डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होईल असेही ते म्हणाले. 
अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, मदतनीस, सेविका यांना आयएसओसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात कंधार तालुक्यातील २0, नांदेड- १२, बिलोली, हदगाव व माहूर तालुक्यातील प्रत्येकी ५, मुदखेड- ४ आणि अर्धापूर तालुक्यातील 0२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सोनवणे, खंदारे, उपलंचवार आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)