महापालिका हद्दवाढ प्रस्तावावर बोलत असतानावाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा शहरी भाग आणि मूळ वाडी गाव मिळून स्वतंत्र नगरपंचायत निर्माण करावी, जेणेकरून या भागाच्या विकासास गती मिळेल, असे मत आमदार कल्याणकर यांनी व्यक्त केले. तसेच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विविध विकासकामे आपण खेचून आणत असल्याचे त्यांनी सांगितले. वाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या १०० खाटांच्या रुग्णालयामुळे निळा, लिंबगाव, मालेगाव या परिसरांतील गावांसह हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना शहरातून वाहतुकीच्या कोंडीचा सामना करीत विष्णुपुरी रुग्णालय गाठावे लागत होते. त्यांची ही गैरसोय लवकरच दूर होणार आहे.
उत्तर वळणरस्त्यासाठी जवळपास ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पुयणी, नेरली, बोंढार, नांदुसा, खुरगाव, दाभड, आदी गावे मुख्य रस्त्याला जोडली जातील. त्याचबरोबर निळा ते एकदरा, तळणी ते निळा, नांदेड ते नाळेश्वर अशा अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम मार्गी लावले असल्याचेही आमदार कल्याणकर यांनी सांगितले.