आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ऑटो रिक्षा चालकांचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. ऑटोसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न ऑटोरिक्षा चालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच कुटुंबाचा गाडा ओढण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे.
चौकट- कोरोना महामारीतील लॉकडाऊननंतर आता कुठे सुरळीत झाले होते. मात्र, मध्येच पेट्रोलचे भाव वाढल्याने पुन्हा ऑटोरिक्षा चालकांचे जगणे अवघड झाले आहे. पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत गेल्यामुळे भाडे परवडत नाहीत. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांसमोर कुटुंबाचा गाडा ओढण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. -मुखीद पठाण, रा. पिरबुर्हाणनगर. नांदेड
चौकट- मागील वर्ष हे कोरोनामुळे खूपच वेदनादायी गेले. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यातच आता पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने दिवसभरात मिळालेल्या भाड्यातून हाती काहीच उरत नाही. ऑटोरिक्षा चालविणे नकोसो झाले आहे. हा व्यवसाय सोडून इतर व्यवसाय कोणता सुरू करावा, तेही कळत नाही. -माणिक भालेराव, रा. विठ्ठलनगर, नांदेड
चौकट- ऑटोरिक्षावर आमच्या कुटुंबाचा भार आहे. मागील अनेक वर्षांपासून याच ऑटोरिक्षावर जगण्याचा मार्ग सापडला होता. मात्र, आता ऑटोरिक्षा चालविणे अवघड झाले आहे. ऑटोरिक्षाचे बँकेचे हप्ते, घराचा किराया, मुलांचे शिक्षण आणि दोन वेळेचे अन्न कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. पेट्रोलच्या दरवाढीने पुन्हा आमचे गणित कोलमडले आहे. - शेख खदीर मौलाना, रा. धनेगाव, वसरणी.