व्यासपीठावर माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, जिल्हा परिषद शालेय व बांधकाम सभापती संजय बेळगे, काँग्रेस प्रदेश युवा सरचिटणीस जितेश अंतापूरकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस दीपक शहाणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर शिंदे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता कळसकर, तालुका अध्यक्ष प्रीतम देशमुख, शिवाजी बळेगावकर, मार्केट कमिटी सदस्य गिरधर पाटील सुगावकर, भाऊसाहेब मंडलापूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले की, आरक्षणासंदर्भात मी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष भेटू घेऊन आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकारकडे नसून ते केंद्र सरकारकडे आहे. यावर तुम्ही योग्य ते निर्णय घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अशी विनंती केलेली आहे. मात्र, राज्यातील कळसूत्री भाजपवाले नेते लोकांची दिशाभूल करून लोकांचे डोके भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या मतदारसंघातील नागरिकांना विनंती करतो की, या भाजपवाल्याच्या भूलथापांना बळी न पडता वास्तविकाची जाण ठेवून पार पडणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्याच उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. तसेच स्वर्गीय अंतापूरकर यांनी हयात असताना अनेक विकासाभिमुख कामे केले. त्यांचे उर्वरित विकासाचे स्वप्न आहेत हे मला सांगून गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या भागाचे पालकत्व मी स्वीकारणार, अशी ग्वाहीही दिली.
तसेच या व माझ्या भागातही वाळूचा गोरखधंदा अधिकाऱ्याच्या मिलीभगतशिवाय चालत नाही याची मला पूर्ण जाण आहे. ही बाब स्वर्गीय अंतापूरकर यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती. त्या अनुषंगाने या अधिकाऱ्याचा मी योग्य तो समाचार घेणार आहे. पीक विमा कोणाच्या नावाने आहे, याचा तुम्ही लेखाजोखा करा. यातून असे आढळून येईल की, प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्यात राज्य सरकारचा कोणताही हातखंडा नाही. तसेच मी जे सांगतो ते करून दाखवतो, खोटे बोलून नौटंकी मी करीत नाही. त्यामुळे येत्या पोटनिवडणुकीत एकजूट कायम ठेवून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, अशी साद चव्हाण यांनी घातली.
या भागातील ८२ कोटी विविध विकासकामे व लोकार्पण उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष शंकर कंत्तेवार, शहर उपाध्यक्ष हाफीस पठाण, विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार, डॉ. धुमाळे, उमेश पाटील, रामदास पाटील बेंबेरेकर, किशोर स्वामी यांच्यासह पंचक्रोशीतील आजी- माजी सरपंच पोलीस पाटील संघटना व युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.