नांदेड : संरक्षण विभागाचे कामकाज आम्हीही जवळून पाहिले आहे. मात्र, साडेपाचशे कोटींचे विमान १,६०० कोटींवर कसे जाते, हे कळायला मार्ग नाही. हा मधला पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला, हे सरकार सांगायला तयार नाही, परंतु ‘खाऊंगा न खाने दुंगा’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना याचे उत्तर देशाला द्यावेच लागेल. राफेलचे भूतच या भ्रष्ट भाजपा सरकारला गाडेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला.
काँग्रेस-राष्टÑवादीसह मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेने बुधवारी नांदेडला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकले गेले. माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, काँग्रेसचे सहप्रभारी संपतकुमार, आ. अमित देशमुख, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील आदी उपस्थिती होते.
पवार म्हणाले, जवानांवर जेव्हा-जेव्हा हल्ला होतो, तेव्हा ते देशावरील संकट समजून सर्व मतभेद विसरून आम्ही एकत्र येतो. पुलवामा हल्ल्यानंतरही विरोधकांनी गृहमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीला हजेरी लावली. मात्र, तेथे जे चित्र दिसले, ते देशासाठी दुर्दैवी होते. सरकारमधील एकही प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हता.बहुत हुई जुमले की मार - खा. अशोक चव्हाणखा. अशोकराव चव्हाण यांनी, ‘बहुत हुई जुमले की मार, अब बदलो मोदी सरकार,’ अशी घोषणा देत पाच वर्षांतील भाजपा सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.